क्षेपणास्त्रांचा वर्षाव करत उत्तर कोरियाची घोषणा
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
अमेरिका आणि दक्षिण कोरियासोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान उत्तर कोरियाने विध्वंस घडवून आणण्यास सक्षम क्षेपणास्त्रांच्या परीक्षणाची छायाचित्रे जारी करत मोठा इशारा दिला आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्या अलिकडेच पार पडलेल्या युद्धाभ्यासाची निंदा करत उत्तर कोरियाने हे पूर्णपणे प्रक्षोभक कृत्य असल्याचे म्हटले आहे. या धोकादायक युद्धाभ्यासाला निर्दयपणे प्रत्युत्तर देणार असल्याचे उत्तर कोरियाने नमूद पेले आहे. उत्तर कोरियाने या युद्धाभ्यासाच्या प्रत्युत्तरादाखल शक्तिप्रदर्शन केले होते.









