हार्पून अन् साइडविंडर क्षेपणास्त्र पुरविणार ः चीनकडून प्रत्युत्तराचा इशारा
वृत्तसंस्था / तैपैई
अमेरिकेकडून तैवानला सुमारे 1.1 अब्ज डॉलर्स म्हणजेच 8,768 कोटी रुपयांची शस्त्रास्त्रs पुरविण्यात येणार आहेत. या शस्त्रास्त्रांमध्ये 60 हार्पून अँटी-शिप क्षेपणास्त्रs, साइडविंडर क्षेपणास्त्रs, रडार वॉर्निंग सिस्टीम आणि 100 एअर-टू-एअर क्षेपणास्त्रs सामील आहेत. 2 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या संसदेच्या सभापती नॅन्सी पॅलोसी यांनी तैवानचा दौरा केला होता. या दौऱयापासूनच चीनचे सैन्य तैवानसमीप सैन्याभ्यास करत आहे. चीनची आक्रमक भूमिका पाहता अमेरिकेने ही सैन्य मदत दिली आहे.
अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीनच्या संतापात अधिकच भर पडली आहे. चीनने अमेरिकेला परिणाम भोगण्यास तयार राहण्याची धमकी दिली आहे. वॉशिंग्टनमधील चीनच्या दूतावासाने अमेरिकेला शस्त्रास्त्रs पुरविण्याचा करार रद्द करण्याची सूचना केली आहे. या करारामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंधांना धोका निर्माण होणार आहे. चीन याच्या विरोधात ठोस पाऊल उचलणार आहे. अमेरिकेचे प्रशासन चीनच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे दूतावासाचे प्रवक्ते लियू पेंग्यु यांनी म्हटले आहे.
चीनच्या आक्रमक भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या नौदलाने 28 ऑगस्ट रोजी स्वतःच्या अत्यंत अत्याधुनिक आण्विक युद्धनौका तैवानच्या सामुद्रधुनीत तैनात केल्या आहेत. चीनने तैवानच्या चहूबाजूला स्वतःची जे-20 लढाऊ विमाने आणि युद्धनौका तैनात केल्या आहेत. अमेरिकेने चीनच्या या कृतीला प्रत्युत्तर म्हणून ठोस पावले उचलली आहेत.









