वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या सैन्याने मध्यपूर्वेत स्वत:ची दोन बी-52 स्ट्रॅटफोर्टेस बॉम्बवर्षक विमाने तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यपूर्वेतून रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास-हिजबुल्लाह संघर्ष, हुती बंडखोर आणि येमेन सवमेत इराक सारख्या ठिकाणांयच रणनीतिक स्थितीवर अमेरिका नजर ठेवू शकतो. युद्धाच्या स्थितीत बॉम्बवर्षक विमाने उपयुक्त ठरू शकतात.
यापूर्वीही अमेरिकेने या बॉम्बवर्षक विमानाला मध्यपूर्वेत तैनात केले होते, परंतु पहिल्यांदा हे विमान कुठे तैनात केले जाणार याचा खुलासा टाळण्यात आला आहे. परंतु मागील वर्षी हे विमान इस्रायलमध्ये तैनात करण्यात आला होता. तर यंदा बाल्टिक समुद्रात हे बॉम्बवर्षक विमान उ•ाण करत युक्रेन विरोधात हल्ला करण्यापासून रोखू शकते.
बॉम्बरची शक्ती
अमेरिका नेहमीच स्वत:च्या मित्रदेशांच्या मदतीसाठी तयार असते. याचमुळे अमेरिका स्वत:च्या या शक्तिशाली बॉम्बरला मध्यपूर्वेत तैनात करत आहे. हे विमान कुठल्याही भागाला काही मिनिटांमध्ये उद्ध्वस्त करू शकते. बी-52 स्ट्रॅटफोर्टेसच्या संचालनासाठी 5 जणांची गरज भासते, यात वैमानिक, सह-वैमानिक, वेपन सिस्टीम ऑफिसर, नेव्हिगेटर आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर ऑफिसरचा मावेश आहे. 159.4 फूट लांबीचे हे विमान 40.8 फूट उंचीचे आहे. याची निर्मिती बोइंग कंपनीने केली आहे.
अत्यंत शक्तिशाली विमान
हे विमान उ•ाण करताना 2.21 लाख किलोग्रॅम वजन वाहून नेऊ शकते. यात एकाचवेळी 1.81 लाख लिटर इंधन भरले जाऊ शकते. या विमानात 8 इंजिन्स असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्राप्त होतो. याचा कमाल वेग 1050 किलोमीटर प्रतितास इतका आहे. याची उड्डाणकक्षा 14,200 किलोमीटर असून एकाचवेळी सहजपणे 16 हजार किलोमीटरपेक्षा अधिक हवाई अंतर कापू शकते. हे विमान कमाल 50 हजार फुटांच्या उंचीवर पोहोचू शकते. या विमानात 32 हजार किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब ठेवला जाऊ शकतो. यात अत्यंत अत्याधुनिक एवियोनिक्स सिस्टीमचा अंतर्भाव करण्यात आल्याने ते शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रs, रॉकट्स, हेलिकॉप्टरची माहिती देत राहते.









