वृत्तसंस्था / झुहेई (चीन)
2024 च्या टेनिस हंगामातल सुरू असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत अमेरिकेने स्लोव्हाकियाचा पराभव करत शेवटच्या आठ संघातील आपले स्थान निश्चित केले.
या लढतीमध्ये अमेरिकेच्या टेनिसपटूंनी शुक्रवारी सलामीच्या दोन्ही एकेरी सामन्यात स्लोव्हाकियाचा पराभव केला. अमेरिकेच्या मॅकडोनाल्डने स्लोव्हाकियाच्या लुकास क्लिनचा 6-4, 6-3 असा पराभव केला. या गटातून आतापर्यंत अपराजित राहिलेला जर्मनीचा संघही उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. ही लढत इनडोअर हार्टकोर्टवर खेळविली जाते. अ गटातून फायनल्ससाठी पात्र ठरण्याकरिता इटलीची लढत बेल्जियमबरोबर बोलोगेना येथे होणार आहे.









