कोटक महिंद्रा बँक-इ@म्पॅक्ट गुरु फाऊंडेशनचा पुढाकार
बेळगाव : कोटक महिंद्रा बँक व इम्पॅक्ट गुरु फाऊंडेशनच्यावतीने केएलई इस्पितळाला देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेला संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी हिरवा झेंडा दाखवून सेवेत रुजू केली. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी रुग्णवाहिकांची भूमिका महत्त्वाची ठरते. तातडीची वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी या दोन संस्थांचे केएलई इस्पितळाला सहकार्य मिळत आहे. अत्याधुनिक रुग्णवाहिका चिकोडी इस्पितळात देण्यात येत असल्याचे डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले. यावेळी काहेरचे उपकुलगुरु डॉ. नितीन गंगाणे, डॉ. व्ही. डी. पाटील, उपप्राचार्य डॉ. राजेश पवार, डॉ. विश्वनाथ पट्टणशेट्टी, बसवराज जेवरगीकर, कोटक महिंद्राचे मधु मोसेस, रघुराम, राजा मोहंती, विशाल माळी, लक्ष्मीकांत खोडे, अश्विनी एन. आदी उपस्थित होते.









