Amit Shah Mumbai Visit: अमित शाह हे ५ सप्टेंबर रोजी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दौऱ्यात त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या कठोर टीकेवरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, अमित शाह (Amit Shah) यांच्या गाड्यांच्या ताफ्याला जाता यावं, म्हणून अँम्ब्युलन्सला अडवून धरण्यात आल्याचा व्हिडिओ तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी ट्विट केला आहे. यामुळे याचीही चर्चा आता रंगली आहे.
काय म्हटलं आहे ट्विटमध्ये
असं काही मुंबईत होईल अशी कल्पनाही तुम्ही केली नसेल. अमित शाह यांच्या गाड्यांच्या ताफ्याला जाता यावं, म्हणून अँम्ब्युलन्सला अडवून धरण्यात आलं. अमित शाह यांनी झेडप्लस सुरक्षा आहे. म्हणजे ते व्हीआयपी आहेत व्हीव्हीआयपी नाहीत. तरीही पहिल्यांदाच त्यांच्यासाठी मुंबईतले रस्ते बंद करण्यात आले. भाजपा सत्तेत आल्यापासून हे होत आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- अमित शाहांचा मुंबई दौरा का महत्त्वाचा? जाणून घ्या एका क्लिकवर
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








