मुंबई
सिमेंट क्षेत्रात कार्यरत कंपनी अंबुजा सिमेंटने डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 488 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला असल्याची माहिती आहे. सदरच्या नफ्यात मागच्या तुलनेत 13 टक्के वाढ कंपनीने नोंदवली आहे. सध्याला अंबुजा सिमेंटची मालकी अदानी समूहाकडे आहे. याच कालावधीत एकत्रित महसूल 4 टक्के वाढीसह 7907 कोटी रुपयांवर पोहचला आहे. सदरच्या तिमाहीत सिमेंट उत्पादनात चांगली वाढ राहिली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.









