मुंबई
सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी अंबुजा सिमेंटने चौथ्या तिमाहीचा निकाल घोषित केला आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत अंबुजा सिमेंटने 502 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. वर्षाच्या आधारावर पाहता नफ्यामध्ये नाममात्र 1.6 टक्के वाढ दर्शवली आहे. दुसरीकडे 8 टक्के वाढीसह 4256 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला आहे. हाच महसूल मागच्या वर्षी 3927 कोटी रुपये इतका होता.









