अनेक महिन्यांनी केली पहिली पोस्ट
जॉनी डेप आणि एंबर हर्ड मागील वर्षी मागील वर्षी मानहानीच्या खटल्यावरून चर्चेत राहिले होते. या खटल्यावर जगभराच्या नजरा लागून राहिल्या होत्या. या खटल्याच्या सुनावणीच्या व्हिडिओंना देखील सोशल मीडियावर मोठी प्रसिद्धी मिळाली होती. हा खटला जॉनी डेपने जिंकला होता. यादरम्यान एंबरने सोशल मीडियापासून अंतर राखले होते. परंतु अखेरीस अनेक महिन्यांनी एंबरने आता एक पोस्ट शेअर केली आहे.

एंबर आणि जॉनी यांच्यातील खटला 6 आठवड्यांपेक्षा अधिक काळ चालला होता. आता या खटल्याच्या प्रभावातून बाहेर पडत एंबर स्वत:च्या जीवनावर लक्ष केंद्रीत करू पाहत असल्याचे मानले जात आहे. एंबर इटलीतील 69 व्या ताओरमिना चित्रपट महोत्सवात ती दिसून आली आहे. स्वत:चा चित्रपट ‘इन द फायर’ या चित्रपटाचे ती प्रमोशन करत आहे. अभिनेत्रीने स्वत:चे एक छायाचित्र शेअर केले आहे.
‘माझा नवा चित्रपट ‘इन द फायर’साठी टॉरमिना चित्रपट महोत्सवात मिळालेला प्रतिसाद भारावून टाकणारा आहे’ असे तिने कॅप्शनमध्ये नमूद पेले आहे. एंबरने यापूर्वीच अखेरची पोस्ट डिसेंबर 2022 मध्ये केली होती.
जॉनी डेप आणि एंबर हर्ड हे 2009 मध्ये ‘द रम डायरी’ या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते, काही वर्षांनी त्यांनी डेटिंग सुरू केले होते. 2015 मध्ये त्यांनी विवाह केला होता. विवाहाच्या एक वर्षानंतरच एंबर अन् जॉन यांच्यात खटके उडू लागले होते. 2016 मध्ये एंबरने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. जॉनीने मद्यधुंद स्थितीत शारीरिक शोषण केल्याचा आरोप एंबरने केला होता.









