वृत्तसंस्था/ मुंबई
आगामी कॅरेबियन प्रिमियर लिग (सीपीएल) स्पर्धेसाठी भारताचा फलंदाज अंबाती रायडूने सेंट किट्स-नेव्हीस पेट्रोट्स संघाबरोबर नुकताच नवा करार केला आहे.
2023 च्या आयपीएल क्रिकेट मोसमात 37 वर्षीय रायडूने चेन्नई सुपरकिंग्जचे प्रतिनिधीत्व केले होते. कॅरेबियन प्रिमियर लिग स्पर्धेत प्रवीण तांबेनंतर सहभागी होणार अंबाती रायडू हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे.









