चार रस्ता सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट
काणकोण : काणकोणच्या भेटीवर आल्यावेळी डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वेन यांनी श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देवस्थानला जशी भेट दिली, त्याचप्रमाणे सभापती रमेश तवडकर यांच्यासमवेत चार रस्ता येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उत्सवातील श्री गणपतीचे दर्शन घेतले आणि तेथील आकर्षक अशा देखाव्याचे कौतुक केले. यावेळी डॉ. आनंदकुमार त्रिपाठी, किशोर सारसोलकर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. चार रस्ता येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात मंडळाचे अध्यक्ष कुशवंत भगत, संस्थापक अध्यक्ष अजय भगत यांनी स्वेन आणि सभापती तवडकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नगरसेवक हेमंत गावकर, विशाल देसाई, दिवाकर पागी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.









