पेठ वडगाव/प्रतिनिधी :
Kolhapur Crime News : अंबप (ता.हातकणंगले) येथे ऊसाच्या शेतात विवस्त्र अवस्थेत सडलेले पुरुष जातीचे प्रेत सापडले आहे. या प्रेताच्या शरीराचे काही भाग गायब असून अत्यंत विचित्र अवस्थेत प्रेत सापडले आहे. यामुळे हा खून असावा का ? अशी शंका व्यक्त होत आहे. मयताची ओळख उशिरापर्यंत पटली नाही. रात्री उशिरापर्यंत वडगाव पोलीस मयताच्या वारसाचा शोध घेत होते. घटनास्थळी वडगाव पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी येवून पंचनामा केला.
वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांनी वडगाव पोलीस ठाण्याच्या व अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेवून मयताची ओळख पटते का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र रात्री उशिरा पर्यंत मयताची ओळख पटली नाही. पोलीस अध्यक्षक रामेश्वर वैंजणे यांनी घटनास्थळी माहिती घेवून तपासाबाबत पोलीस निरीक्षक तळेकर यांना मार्गदर्शन केले. रात्री उशिरा मृतदेह सीपीआर रुग्णालयात ठेवण्यात आला. याची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.
Previous Article‘मापात पाप’ उघडकीस आणल्याने ‘तरुण भारत’च्या वार्ताहरावर हल्ला
Next Article प्रयाग चिखलीत ४ ठिकाणी चोरी, ३५ हजाराची रोकड लंपास









