नवी दिल्ली
: फोर्ब्सची यादी नव्याने अद्ययावत करण्यात आली असून यामध्ये जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे आता 24 व्या क्रमांकावर आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. अमेरिकन मासिक फोर्ब्सच्या माहितीनुसार 2022 मध्ये मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज ही 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिकचा महसूल मिळवणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे.
रिलायन्स, पेट्रोलियम, टेलिकॉम, रिटेल आणि एफएमसीजी यासह अनेक व्यवसायांमध्ये गुंतलेली आहे. अमेरिकन मासिक फोर्ब्सच्या 2023 च्या अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्सचे मुकेश अंबानी यांची आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नोंद आहे. फोर्ब्सने दिलेल्या अहवालानुसार अंबानी हे 83.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसोबत जगातील नवव्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती राहिले आहेत. जागतिक श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची 24 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. 24 जानेवारी रोजी गौतम अदानी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती त्र्47.2 अब्ज आहे.









