ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजपने राष्ट्रवादीसोबत केलेली युती भाजप कार्यकर्त्यांना फारशी रुचलेली दिसत नाही. भाजप कार्यकर्त्याचे असेच एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हे कॉल रेकॉर्डिंग ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
‘दोन फुल, एक हाफ’ सरकारबाबत ‘मन की बात’! भक्तांनो, कानात गरम तेल घातल्यासारखे होईल.. पण ऐकाच.. बाजारात बरनॉल संपले असेल तर तेथील शिवसैनिकांना सांगा.. मिळवून देतील, असं म्हणत दानवेंनी कॉल रेकॉर्डिंग शेअर केलं आहे.
दोन फुल, एक हाफ सरकारबाबत 'मन की बात'!
भक्तांनो, कानात गरम तेल घातल्यासारखे होईल.. पण ऐकाच.. 😊
बाजारात बरनॉल संपले असेल तर तेथील शिवसैनिकांना सांगा.. मिळवून देतील. #MaharashtraPolitics pic.twitter.com/2saWXZB3oK
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 10, 2023
या कॉल रेकॉर्डिंगनुसार, हा फोन भाजप पक्ष कार्यालयाकडून एका कार्यकर्त्याला आला आहे. कार्यालयातून बोलणारी व्यक्ती ओळखपत्रासाठी कार्यकर्त्याला ब्लड ग्रुप विचारते. त्यावेळी भाजपने राष्ट्रवादीला सत्तेत सोबत घेतल्याबद्दलची नाराजी व्यक्त करत तो कार्यकर्ता ब्लड ग्रुप देण्यास नकार देतो.