सत्तारूढ आणि विरोधी अशा शिवसैनिकांचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत असून यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि संदिपान भुमरे हे एकमेकांवर धावून गेल्याचे दिसत आहे. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपावरून झालेल्या या राड्याची चर्चा सोशल मीडीयावर होत असून राजकिय क्षेत्रातून यावर प्रतिक्रिया येत आहेत.
औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक आज संपन्न झाली. या वेळी जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकारीही उपस्थित होते. शिंदे गटाचे नेते आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यासह शिवसेने ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचीही उपस्थिती होती.
यावेळी कन्नज मतदार संघाच्या आमदाराने आपल्याला राज्याचा निधी मिळत नसल्याचा आरोप केला. तसेच निधीवाटपामध्ये दुजाभाव केला जात असल्याचे दावा केला. यावर आमदार अंबादास दानवे यांनी याबाबत जाब विचारला. अंबादास दानवे यांच्या आरोपांना पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. शब्दाला शब्द वाढ गेल्यावर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. यानंतर काही वेळाने दोन्ही नेत्यांमधील वाद थांबल्याची माहिती मिळाली आहे.









