शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या शिष्टमंडळाची मागणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
कोल्हापूर
कोल्हापूरसह महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरतर्फे २५ हजार रुपयांची मदत मिळावी अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या शिष्टमंडळाने केली. यासंदर्भातील निवेदन शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कक्षाचे संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे, सिद्धीविनायक ट्रस्ट, दगडूशेठ गणपती ट्रस्ट, तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्ट यासह विविध मंदिराच्या ट्रस्टतर्फे गरजू रुग्णांना वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत केली जाते. त्याचप्रमाणे अंबाबाई मंदिरातर्फेही गरजू रुग्णांना 25 हजार रुपयांची मदत करण्यात यावी. यामुळे गरजू रुग्णांना दिलासा मिळेल, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदना संदर्भात सकारात्मक विचार करण्याबाबत सूचना केली. यावेळी आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते.
Previous Articleकन्व्हेक्शन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू
Next Article राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्र सन्मानित








