करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदीर परिसरात सुमारे 30 ते 40 वर्षापासून असणाऱ्या खाजगी चपल स्टँडवर आज महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने पोलीस बंदोबस्तात कारवाई केली आहे. त्यातच आज या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होती. हा वाद न्यायासयात प्रलंबित असताना महापालिकेने कारवाई केलीच कशी असा सवाल वकिलांनी विचारला.
आज सकाळी अंबाबाई परिसरात महापालिकेने अतिक्रमण विरोधात कारवाई केली. अंबाबाई परिसरातील अतिक्रमणाचा वाद न्यायालयात प्रलंबित असून त्यासंबंधीची सुनावणी आज होती. सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना चप्पलस्टँडधारक यांचे वकिल अॅड. प्रकाश मुंडे यांनीही कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. तरीही कोणत्याही प्रकारची सुचना किंवा नोटीस न देता महापालिकेने ही कारवाई केली आहे. या कारवाईवेळी पोलीसांकडून बळाचा वापर करण्यात आला. त्यामुळे या कारवाईविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असून योग्य तो निकाल न्यायलयाकडून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.









