Amit Shah Kolhapur Visit : भाजप नेते केंद्रीय गृह मंत्री अमित शहा कोल्हापुरात येणार म्हणून शहरात जय्यत तयारी केली होती. शहरात स्वच्छतेपासून ते रस्त्याच्या नियोजनात पोलीस आणि प्रशासनाने कोणतीही कसूर ठेवली नाही. अमित शहा कोल्हापुरात दाखल होताच त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर शिवजयंतीनिमित्त कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


















