कोलकाता :
इ-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी अमेझॉन भारतात आगामी काळात विविध प्राकृतिक प्रकल्पांकरीता 30 लाख डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. कंपनीने यासंदर्भातली माहिती देताना सांगितले की आशिया प्रशांत विभागात कंपनी आगामी काळात 1.5 कोटी डॉलरपैकी 30 लाख डॉलर्सची गुंतवणूक भारतातील प्राकृतिक प्रकल्पांमध्ये करणार आहे. पश्चिमी घाटाचे संरक्षण करण्यासंबंधीच्या प्रयत्नातही कंपनी सेंटर फॉर वाइल्डलाइफ स्टडीज यांच्यामार्फत हातभार लावणार असल्याचे समजते.









