अमेरिकेतील केडेन कोलमेन नामक ट्रान्सजेंडर व्यक्तीने काही काळापूर्वी दोन कन्यांना जन्म दिला आहे. यामुळे ते अमेरिकेतील प्रथमच ‘एकल पिता’ (सिंगल फादर) बनले आहेत. मातृत्व प्राप्त करण्यासाठी त्यांना बऱ्याच शारीरीक, भावनिक आणि सामाजिक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. तथापि, या सर्व समस्यांवर मात करत अखेर त्यांनी आपला निर्धार पूर्ण करुन दाखविला आहे.
एका ट्रान्सजेंडर किंवा तृतीयपंथीय व्यक्तीला अपत्यप्राप्ती होऊ शकते, यावर आजही अनेकांच्या विश्वास बसत नाही. हा प्रकार खोटा असून कोलमेन यांचा तो केवळ प्रसिद्धी स्टंट आहे, असा आरोप अनेकांनी केला आहे. तर हा सर्व खटाटोप संस्कृतीभंजक आहे असेही अनेकांना वाटते. काहीवेळा आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येतात असे कोलमेन यांचे म्हणणे आहे. तरीही आपण आपल्या दोन कन्यांचे पालनपोषण त्यांची आई आणि त्यांचा पिता या दोन्ही नात्यांनी करत राहू असा निर्धार ते व्यक्त करतात. त्यांच्या कन्यांना त्यांच्यापासून दूर ठेवले जावे, अशी अनेक लोक सूचना करतात. तसे न केल्यास समाजात वावरणे या मुलींना कठीण जाईल. अमेरिकेसारख्या देशातही अद्याप समाजिक स्थिती अशा अपत्यांना सामावून घेईल अशी बनलेली नाही, असे अनेक सहानुभूतीदारांना वाटते. कोलमेन हे शिक्षण क्षेत्रात काम करत असत. त्यांना वयाच्या 19 व्या वर्षी आपण तृतीयपंथीय आहोत, याची जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन काही संप्रेरकांचे उपचार करुन घेतले. अपत्यांना जन्म देण्यासाठीही त्यांना काही जटील शस्त्रक्रिया करुन घ्याव्या लागल्या. आता त्यांना केलेल्या कष्टाचा अभिमान वाटतो. पण त्यांच्या मातृत्वाने जो वाद निर्माण









