शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
आचरा प्रतिनिधी
शिंदे गटा शिवसेनेतर्फे आचरा तिठा येथे आयोजित नारळ लढविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत अमर गावकर हे विजेते ठरलेत. तर राजा सावंत हे उपविजेते ठरले. विजेत्यांना रोख रक्कम व चषक देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेत 128 स्पर्धक सहभागी झाले होते. उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेवेळी मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले की आपले सण परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम अशा स्पर्धा मधून होत आहे. तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांच्या सोबत उपजिल्हा प्रमुख महेश राणे, तालुका प्रमुख विनायक बाईत, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, अल्पसंख्यांक चे विभागीय अध्यक्ष मुझफ्फर मुजावर, जयप्रकाश परुळेकर, भाऊ हडकर, अभिजित सावंत, बाबू कदम, उदय घाडी,ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, महेंद्र घाडी, चंदू कदम,किशोरी आचरेकर,मनोज हडकर, तसेच हर्षद धुरी,किशोर हिर्लेकर, शशिकांत नाटेकर, बाईत, यांसह बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आचरा पत्रकार, जेष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष यांचा सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.









