200 मी बॅकस्ट्रोकमध्ये मिळविले यश
बेळगाव : बिहार येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स जलतरण स्पर्धेत बेळगावच्या अमन अभिजित सुणगारने कर्नाटक संघाचे प्रतिनिधीत्व करताना घवघवीत यश संपादन केले. बिहार येथे घेण्यात आलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स क्रीडा स्पर्धेत जलतरण विभागात बेळगावचा जलतरणपटू अमन अभिजित सुणगारने 200 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य पदक पटकावित यश संपादन केले आहे. अमन हा बेळगावचा पहिला जलतरणपटू असून त्याने वैयक्तिक पदक पटकाविले आहे. अमन हा सध्या बेंगळूर येथील डॉल्फीन अॅक्वेटिक इंडियन जलतरण तलावात सराव करीत असून त्याला निहार अमिन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्या शिवाय बेळगावच्या स्विमर्स व अॅक्वेरियस क्लबच्या प्रशिक्षक अक्षय शेरेगार, उमेश कलघटगी यांचे प्रोत्साहन मिळाले.









