क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
केरळा येथे तिरुवनंतपुरम येथे सुरु असलेल्या साऊथ झोन राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पहिल्या दिवशी बेळगावच्या स्विमर्स व अॅक्वेरियस क्लबचा जलतरणपटू अमन सुणगार याने 2 सुवर्णपदक पटकाविले आहेत. कर्नाटकाने मिडले रिलेमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला.
या स्पर्धेत 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये कर्नाटकाचा (बेळगाव) अमन सुणगारने सुवर्णपदक, कर्नाटकाच्या राघू स्वच्छनदामने रौप्य, पाथूरी बुवास (कर्नाटका) याने कांस्यपदक पटकाविले तर 4×100 मी. मिडले रिलेमध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. त्यात अमन सुणगारचा सिंहाचा वाटा आहे. संघात विशवागन सारवनन, अक्षय ठाकुरीया, रेणुकाचार्या होदामनी या जलतरणपटूंचा समावेश आहे. या गटात कर्नाटकला सुवर्ण, तामिळनाडूला रौप्य तर तेलंगणाने कांस्यपदक पटकाविले. पहिल्या दिवशी बेळगावच्या अमन सुणगारने कर्नाटकाचे सुवर्णपदकाचे खाते उघडले आहे. त्याला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितिश कुडूचकर, गोवर्धन काकतीकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









