वृत्तसंस्था / अमन (जॉर्डन)
येथे सुरू असलेल्या 15 आणि 17 वर्षांखालील वयोगटाच्या आशियाई मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या अमन सिवाचने प्रतिस्पर्ध्यावर शानदार विजय मिळविला.
पुरुषांच्या 63 किलो वजन गटातील लढतीत भारताच्या अमन सिवाचने किर्जीस्थानच्या अबुबाकर डुशिनेव्हचा 4-1 अशा गुण फरकाने पराभव केला. तर पुरुषांच्या 70 किलो वजन गटात भारताच्या अनशुल खासाला कझाकस्थानच्या के.युर्मीबासेरकडून 0-5 कसा पराभव स्वीकारावा लागला.









