वृत्तसंस्था/ पाँटेवेद्रा (स्पेन)
येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील वयोगटाच्या पुरुष आणि महिलांच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची महिला मल्ल अमन शेरावतने सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेमध्ये अमनने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देत नवा इतिहास घडवला आहे. महिलांच्या विभागातील झालेल्या अंतिम लढतीत भारताची अमन शेरावतने तुर्कीच्या अहमद दुमानचा 12-4 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तुर्कीची दुमान ही कनिष्ठांच्या युरोपियन कुस्ती स्पर्धेतील रौप्यपदक विजेती आहे. 16 वर्षीय अमन शेरावतने दर्जेदार कामगिरीचे प्रदर्शन करीत सुवर्णपदकापर्यंत झेप मारली. यापूर्वी विश्व कुस्ती स्पर्धेत पुरुष विभागात भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते मल्ल बजरंग पुनिया आणि रवीकुमार दाहिया यांनी आपल्या वजन गटातून अंतिम फेरी गाठली होती आणि भारताला त्या स्पर्धेतून केवळ एकमेव रौप्यपदक मिळविले होते. भारतीय महिला मल्ल अमन शेरावतने 23 वर्षाखालील वयोगटाच्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण तर 20 वर्षाखालील वयोगटाच्या आशियाई स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते.









