वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्ती या क्रीडा प्रकारात भारताला कास्यपदक मिळवून देणारा मल्ल अमन सेहरावतला रेल्वे खात्यामध्ये बढती देण्यात आली आहे.
अमन सेहरावत हा उत्तर रेल्वे विभागात आपली सेवा बजावत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक मिळविल्याने रेल्वे खात्याने त्याला स्पेशल ड्यूटी अधिकारी म्हणून बढत देण्याचा निर्णय घेतला आहे. सेहरावतने पुरूषांच्या 57 किलो फ्रिस्टाईल कुस्ती प्रकारात कास्यपदक मिळविले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणारा 21 वर्षीय अमन सेहरावत हा सर्वात तरुण मल्ल आहे. उत्तर रेल्वेच्या प्रमुख कार्यालयामध्ये सरव्यवस्थापक शोभन चौधरी यांच्या हस्ते अमन सेहरावतचा खास गौरव करण्यात आला.









