प्रतिनिधी,कोल्हापूर
Rajaram Suger Factory election 2023 : विरोधकांच्या कारखान्याप्रमाणे राजाराम कारखान्यात बाराशे टनाचा एक टन नसतो,असा टोला माजी आमदार अमल महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना नाव न घेता लगावला.तसेच कारखान्याच्या सुज्ञ सभासदांना राजारामच्या वजन काट्यावर पूर्ण विश्वास आहे. कुठल्याही काट्यावर वजन करून ऊस घातला तरी वजानामध्ये एक किलोचाही फरक आढळणार नसल्याचे महडिक यांनी सांगितले.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारार्थ माजी आमदार अमल महाडिक यांनी कणेरी, कणेरीवाडी गावांचा दौर केला. याप्रसंगी सभासदांशी संवाद साधताना ते बोलत होते.
माजी आमदार महाडिक म्हणाले, सत्ताधारी आघाडीच्या पारदर्शक कारभारावर सभासदांचा पुर्णपणे विश्वास आहे.मात्र दररोज वेगळा मुद्दा घेवून सभासदांची दिशाभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न विरोधकांडकडून सुरु आहे.आता त्यांनी कारखान्यातील वजन काट्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.मात्र विरोधकांच्या कारखान्याप्रमाणे राजाराममध्ये बाराशे किलोचा एक टन नसतो. आता वजन काट्याचा मुद्दाही चालणार नाही हे लक्षात आल्याने विरोधक अन्य मुद्दा घेवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. कारण सभासदांची दिशाभूल करणे हाच त्यांच्या प्रचाराचा अजेंडा असल्याचा आरोप माजी आमदार महाडिक यांनी केला.
गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील यांनी सुडाचे राजकारण करण्याची ज्यांची परंपराच आहे अशा विरोधकाना आता सभासद त्यांची जागा दाखवतील.याच शेतकऱ्यांच्या मुलांकडून डोनेशन घेऊन साम्राज्य उभं करणारे आज शेतक्रयाचा कळवळा असल्याचे दाखवत आहेत,असा टोला पाटील यांनी लगावला. यावेळी शिवाजीराव पाटील, प्रमोद पाटील, पांडुरंग खोत, बाजीराव खोत,अर्जुन इंगळे,मधुकर पाटील,दत्तात्रय पाटील,चंद्रकांत शिंदे,आनंदराव माळी,दत्तात्रय यादव यांच्यासह सभासद शेतकरी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









