kolhapur Rajaram Sugar Factory Election : निवडणुका आल्या की राजाराम कारखान्यात हुकूमशाही आहे म्हणायचं आणि सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा हाच एककलमी कार्यक्रम विरोधकांचा सुरू आहे.पण विरोधकांनी हुकूमशाही बाहेर शोधण्याऐवजी स्वतःच्या संस्थांमध्ये डोकावून बघावं असा उपरोधक सल्ला अमल महाडिक यांनी दिला.टोप येथे आयोजित शेतकरी सभासद मेळाव्यात ते बोलत होते.राजाराम कारखान्याच्या निवडणूक प्रचारासाठी त्यांनी टोप,संभापूर,पट्टणकोडोली,रुई,मिणचे या गावांचा दौरा नुकताच पार पडला.राजाराम कारखान्याचा कारभार उत्तम प्रकारे सुरू आहे याची सभासदांना खात्री आहे,म्हणूनच गेली अनेक वर्ष त्यांनी आम्हाला सेवेची संधी दिली आहे, असेही अमल महाडिक यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना कारखान्याचे माजी चेअरमन शिवाजी रामा पाटील यांनी सर्जेराव माने यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. ज्यांच्या जीवावर तुम्ही संचालक झाला,चेअरमन झाला त्यांनाच विसरला. केवळ स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही आज विरोधकांसोबत गेला आहात. पण राजाराम चे स्वाभिमानी सभासद तुमच्या या गद्दारीचं फळ तुम्हाला निश्चित देतील अशा शब्दात पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी सरपंच तानाजी पाटील, धनाजी पाटील, विजयसिंह घोरपडे, दामोदर पाटील, माजी सरपंच पिलाजी पाटील, माजी सभापती डॉ.प्रदीप पाटील,बाजार समिती सदस्य शिवाजी पाटील, वीरधवल पाटील, डॉ.संजय मिरजकर, विजयसिंह पाटील, माणिक पाटील, विष्णुपंत गायकवाड, डॉ. कल्लेश्वर मुळीक, लक्ष्मण पाटील तात्या, आनंदा भोसले, बापू पोवार, शिवाजी चौगले, बाबासाहेब पाटील, विठ्ठल पाटील, अमित पाटील, रमेश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि राजाराम कारखान्याचे सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articleझटपट आणि चविष्ट ब्रेड चिवडा
Next Article यंदाच्या गुढीपाडव्याला असा करा झटपट मेकअप









