ज्या सतेज पाटलांनी महाडिकांना बावड्यात पाय ठेवू देणार नाही म्हंटलं होतं. त्यावेळी आप्पा स्वतः सतेज पाटील यांच्या बावड्यातील घरात गेले होते. त्यावेळी बंटी पाटील घाबरून घरातून बाहेर आले नाहीत…महाडिक भ्याले नाहीत तर मैदानातच आहेत. असे प्रत्युत्तर माजी आमदार अमल महाडिक यांनी दिले. राजाराम सहकारी साखर कारखान्या संदर्भात आज पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर हल्लाबोल चढवला. कारख्यान्याचे सभासद त्यांचाच कंडका पाडतील, असेही अमल महाडिक म्हणाले.
पहा VIDEO>>> आप्पा बावड्यात गेले त्यावेळी घाबरून बाहेर आले नाहीत-अमल महाडिक
यावेळी बोलताना ते म्हणाले, “माझ्या वडिलांच्या गाडीचे दार उघडणाऱ्यांना घाबरण्याची गरज नाही. माझ्या वडिलांचा हात धरून ते राजकारणात आले आहेत. सतेज पाटलांना आपला पराभव दिसल्यानेच हे वक्तव्य केले आहे.” असा हल्लाबोल माजी आमदार अमल महाडीक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “हे लोकशाहीचे राज्य आहे, त्यांनी य़ाबाबत यंत्रणेला विचारावे. सभासद कारखान्याचे मालक आहेत, त्यांच्या दारी मला जावेच लागेल. जिल्ह्यातील सहकारी संस्थेतील सत्तेचा वापर करून ते राजाराम कारखान्याची निवडणूक लढवत आहेत. लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवत असाल तर तुमच्या कारखान्याची निवडणूक का लागली नाही?” असा थेट सवाल त्यांनी सतेज पाटील यांना केला.
शेवटी बोलताना ते म्हणाले, , “तुम्ही कितीही विरोध करा, येत्या दोन वर्षात जिल्ह्यातील सर्वात जास्त ऊसदर देणारा कारखाना हा राजाराम कारखाना असेल. पहिला रडीचा डाव सतेज पाटील यांनी केला आहे. 1800 शे सभासदांवर त्यांनी हरकत घेतली तो रडीचा डाव दिसला नाही का? त्यावेळी तुम्हाला शेतकरी दिसला नाही का?” अशी विचारणाही त्यांनी केली.