वृत्तसंस्था / बॅसेट्री
बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात खेळताना विंडीजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने आयसीसीच्या शिस्त पालन नियमांचा भंग केल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.
हा सामना सुरू होण्यापूर्वी विंडीजच्या जोसेफने चौथ्या पंचाशी हुज्जत घालताना काही अपशब्दांचा वापर करत संताप व्यक्त केला. जोसेफला खेळपट्टीवरुन जाण्यास पंचांनी विरोध केला. त्यावेळी उभयतांमध्ये शाद्बिक चकमक घडली. या प्रकरणाची दखल घेवून आयसीसीच्या शिस्तपालन समितीने जोसेफला सामना मानधनातील 50 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावली आहे.









