वृत्तसंस्था/ बेसील
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या स्वीस इनडोअर खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत कॅनडाच्या फेलीक्स ऑगेर अॅलिसीमेचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. मात्र बेन शेल्टन आणि होल्गेर रुने यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
मिपेसी पेरीकार्डने अॅलिसीमेचा 6-1, 7-6(8-6) असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. या सामन्यात पेरीकार्डने 22 बिनतोड सर्व्हिसची नेंद केली. पेरीकार्ड आणि कॅनडाचा शेपोव्हॅलोव्ह यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. बेन शेल्टनने स्वीसच्या वावरिंकाचा 7-6(7-2), 7-5 तसेच होल्गेर रुनेने स्वीसच्या स्ट्रीकेरचा 6-3, 7-6(7-2) असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. सित्सिपसने उपांत्यपूर्व फेरी गाठताना झेंडस्कल्पचा 7-6(7-3), 7-5 असा फडशा पाडला.









