प्रतिनिधी / बेळगाव
येथील शेख शिक्षण महाविद्यालयात नुकताच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून आरसीयूचे डॉ. आकाश व अध्यक्ष म्हणून शेख ग्रुपचे समन्वयक डॉ. एम. जे. अत्तार उपस्थित होते. दीपप्रज्वलन व प्रार्थनेनंतर प्राचार्या डॉ. इंदिरा सुतार यांनी विद्यार्थ्यांचे व पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी डॉ. आकाश म्हणाले, मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. आजी व माजी विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांचा वापर करून शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करावी. डॉ. अत्तार म्हणाले, विद्यार्थ्यांनी सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी उत्तमप्रकारे ज्ञानार्जन करणे आवश्यक आहे.
यावेळी विद्यापीठ परीक्षेत उत्तम गुण मिळविलेल्या स्वाती पाटील, दीपा नायक, उल्फत वडगांवकर, सानिया देसाई, निकिता जाधव यांचा तर सक्रिय माजी विद्यार्थी म्हणून कविता फडके, अमित पाटील, मुनीर माडीवाले यांचा सत्कार करण्यात आला. कनिज फातिमा यांनी आभार मानले. तस्मिया फनिबंद यांनी सूत्रसंचालन केले.









