बेंगळूर : सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना कमी केलेली रजा पर्यायी मार्गाने देण्याचा विचार करू, असे शिक्षण मंत्री मधु बंगरप्पा यांनी स्पष्ट केले. रविवारी बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना, सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणासाठी शिक्षकांचा उपयोग केल्याने मुलांच्या शिक्षणात कोणताही व्यत्यय येणार नाही. दसऱ्याच्या सुटीच्यावेळी 15 दिवसांच्या आत सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे. सर्वेक्षणात ख्रिश्चन धर्मासह उपजातींचा समावेश करण्यास आक्षेप होता. आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा केली. दरम्यान, कोणीही बोलले नाहीत. अनावश्यकपणे अफवा पसरवू नयेत, असे त्यांनी सांगितले.
उपजातींच्या समावेशाबाबत मी लोकांचे मत देखील मांडले आहे. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी उपजाती वगळण्याचे निर्देश दिले आहेत. या काळातील रजा शिक्षकांना पर्यायी मार्गाने देण्याची योजना आहे. सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्यांना सरकार अतिरिक्त मानधन देईल. शिक्षक संघटनेच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. मी त्यांना सर्वेक्षण अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची विनंती केली आहे, असेही मंत्री मधु बंगारप्पा म्हणाले. सर्वेक्षणासाठी शिक्षकांचा वापर करू नये अशी चर्चा आहे. परंतु यासाठी अद्याप कोणतीही पर्यायी व्यवस्था निर्माण झालेली नाही. केंद्र सरकारकडून होणाऱ्या जात आणि लोकसंख्या जनगणनेसाठी शिक्षकांव्यतिरिक्त कोणाचा वापर केला जाईल, असा प्रश्न मधु बंगारप्पा यांनी उपस्थित केला.









