शेतकऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. ऊस पिकासाठी एकरी किमान 20 हजार रुपये शेतकऱयाला खर्च करावा लागतो. तोदेखील अंगलट आला असून तातडीने योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी श्री कुमारेश्वर ऊस उत्पादक शेतकरी संघाने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावषी अतिपावसामुळे सर्वच पिकांना फटका बसला आहे. ऊस पिकाला सर्वात जास्त फटका बसला असून शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करून ऊस उत्पादक शेतकऱयांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. मुनवळ्ळी येथील रेणुका शुगर्स साखर कारखान्याने 2021-22 मधील ऊसबिले दिली नाहीत. तेंव्हा संबंधीत साखर कारखान्याला ऊसबिल देण्यासाठी भाग पाडा, असेही या निवेदनात म्हटले आहे.
जिह्यामध्ये पावसाने बहुसंख्य पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई दिली पाहिजे. काही मोजक्मयाच शेतकऱयांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तेंव्हा योग्य सर्व्हे करून द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी सी. आर. नलगे, सुरेश भोगी, ईराप्पा नलवडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









