उपसरपंच जावेद खतीब यांची माहिती
प्रतिनिधी बांदा
मुंबई गोवा महामार्गालगत बंदअसलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह सुरू होण्यासाठी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधू, अशी माहिती उपसरपंच जावेद खतीब यांनी दिली. सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच खतीब आदींनी या विश्रामगृहाची आज पाहणी केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळूसावंत, रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, शैलेश केसरकर, तनुजा वराडकर, माजी सरपंच गुरु धारगळकर आदी उपस्थित होते. गोव्यातून महाराष्ट्रात येताना बांदा हे पहिले शहर असल्याने व या ठिकाणी लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकाऱ्यांची मोठी वर्दळ असल्याने येथील विश्रामगृह सुरू होणे गरजेचे आहे. गेली अनेक वर्षे या ठिकाणी विश्रामगृहाची इमारत आहे. काही काळासाठी येथे महसूल मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय स्थलांतरित केले होते. इमारत सुस्थितीत असून विश्रामगृह सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.









