बेळगाव : वर्षभराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकरी काबाडकष्ट करतो. विशेष करून पावसाळा सुरू झाला की, शेतकऱ्यांना चिंता लागते ती शेतीकामाची. कारण निसर्गावर विसंबून असणारा शेतकरी राजा आपली भातरोप लागवड, भात पोसवणी, सुगी हंगाम सुरळीत पार पडो, अशीच अपेक्षा निसर्ग राजाकडे करतो. त्यामुळे शेतकरी आता भातरोप लागवडीच्या कामात गुंतला आहे. कष्टाची भाकर व घामाच्या धारा गाळत भातरोप लागवड हंगाम साधण्यासाठी धडपडतोय. अशा महत्त्वाच्या कामात गुंतलेल्या शेतकरी राजांची टिपलेली छायाचित्रे कष्टाची जाणीव करून देतात.










