Almatti Dam : कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या दमदार पावसाने पंचगंगा नदी पुन्हा एकदा पात्राबाहेर पडली आहे. आज 4 वाजेपर्यं राजाराम बंधारा पाणी पातळी 33 फूट 2 इंच इतकी आहे. तर पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दुसरीकडे दुधगंगा धरणाचे सांडव्यावरील ५ वक्राकार दरवाजे उघडले असून त्यातून 423 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. तसेच पाॅवर हाऊसमधून 1 हजार क्युसेक्स असा एकूण 1 हजार 423 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने माहिती दिली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने आज धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आला आहे.
दरम्यान अलमट्टी धरणातूनही आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सध्या अलमट्टी धरणात 95 टक्के पाणीसाठा झाल्याने 72 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यापूर्वी 6 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. अलमट्टी धरणाची पाणी क्षमता 123.01 टीएमसी आहे. आतापर्यंत 117.376 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणामध्ये सध्या 37 हजार 41 क्युसेस पाण्याची आवक होत आहे, तर 72 हजार क्युसेक्सने विसर्ग केला जात आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








