सावंतवाडी शहरातील व्यायामपटूंचे प्रेरणास्थान असणारे वाळके मास्तर (व्यायाम शाळा) सावंतवाडी वाळके मास्तर यांच्या आज जयंतीनिमित्त स्वराज्य स्वराज्य संघटना व आजी-माजी व्यायामपटू यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्वराज्य संघटनेमार्फत पेशंट व स्टाफ साठी 60 खुर्च्या देण्यात आल्या तसेच माजी नगरसेवक सुधीर आरिवडेकर यांच्याकडून हॉस्पिटलला एक्वागार्ड मशीन देण्यात आली. त्यांच्या या उपक्रमाचे हॉस्पिटल मधील स, व डॉक्टर वर्गाकडून आभार मानण्यात आले. याप्रसंगी शहरातील प्रख्यात वकील बापू गव्हाणकर, व्यावसायिक राजू भालेकर, जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, डॉ. संदीप सावंत, डॉ.चौगुले, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अमोल साटेलकर तसेच, दिनेश गावडे ,कृष्णा, जेहूर शेख, नंदू गावडे माझी व्यायाम प्रशिक्षक रमेश साटेलकर, एल एस निचम, विशाल पोतनीस, नाना शितवळे ,मनोज हवालदार रवी जाधव तसेच या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी खास करून आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच ज्यांनी महाराष्ट्र कामगार श्री मारलेली ते किशोर सोंसुरकर व त्यांचा मुलगा अंकित सोंसुरकर हे देखील आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे आणि या कार्यक्रमासाठी ते दोघेही आवर्जून उपस्थित राहिले होते जेष्ठ वकील बापू गव्हाणकर यांच्याकडून या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अमोल साटेलकर यांनी केले तसेच स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते त्यांनी देखील या उपक्रमाला हातभार लावला त्यांच्या या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









