सातार्डा -प्रतिनिधी
कवठणी येथील ग्रामपंचायत कार्यालयच्यावतीने पंधराव्या वित्त आयोग निधीमधून कवठणीतील अंगणवाडीला बेंच वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच अजित कवठणकर, माजी महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, उपसरपंच सोनम कवठणकर, ग्रामपंचायत सदस्य अजय सावंत, श्रद्धा कवठणकर,रश्मी कवठणकर, भाजपा बूथ अध्यक्ष श्याम नाईक, अंगणवाडी सेविका आरती कोरगावकर, वायरमन महादेव कवठणकर, भाजपा महिला बूथ अध्यक्षा रेखा रेडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous Article‘सीटीईटी’ परीक्षा यंदा ऑफलाईन
Next Article सिंधुदुर्गात ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत !









