55 वर्षांपासून स्वत:ला पिंजऱ्यात केलेय कैद
जगात पुरुष अन् स्त्रियांचे प्रमाण जवळपास समान आहे. पुरुष आणि स्री विवाह करून एकत्र राहत असतात. परंतु आजच्या काळातही काही लोक एखाद्या खास कारणामुळे एकटे राहणे पसंत करतात. सोशल मीडियावर अशाच एका एकट्याने राहणाऱ्या व्यक्तीची चर्चा होत आहे.

कॅलिटेक्स नजमुईता नावाच्या या व्यक्तीने आजवर महिलांशी कधीच संपर्क साधला नाही. 71 वर्षीय या व्यक्तीने स्वत:च्या घराच्या चहुबाजूला 15 फुटांचे कुंपण उभारले आहे. तो स्वत:ला या कुंपणातच कैद करून ठेवतो. कॅलिटेक्स याना महिलांची भीती वाटते, याचमुळे त्यांनी स्वत:ला स्वत:च्याच घरात कैद केले आहे. कुठल्याही महिलेशी संपर्क येऊ नये असा म्हणून त्यांनी हा खटाटोप केला आहे.
कॅलिटेक्स आता 71 वर्षांचे झाले आहेत, या इतक्या दीर्घ आयुष्यात त्यांनी कधीच कुठल्याही महिलेशी संपर्क साधलेला नाही. त्यांनी विवाह केला नाही तसेच कुठल्याही महिलेवर प्रेमही केले नाही. कॅलिटेक्स यांना महिलांची मोठी भीती वाटते. महिलांना स्वत:पासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी स्वत:च्या घराच्या भवती 15 फुटांची एक भिंतच उभी केली आहे. कॅलिटेक्सला महिलांबद्दल वाटणाऱ्या भीतीमुळे त्यांनी मागील 55 वर्षांमध्ये बाहेरील जगच अनुभवलेले नाही.
स्वत:ला 55 वर्षांपासून कैद ठेवण्याचे कारण कॅलिटेक्स यांनीच सांगितले आहे. लहान असताना घरात एखादी महिला आल्यावर मोठी भीती वाटायची, स्वत:ची ही भीती संपविण्यासाठी समस्येपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. स्वत:ला महिलांपासून पूर्णपणे कट ऑफ केले होते. परंतु ज्या महिलेमुळे त्यांना ही भीती वाटते, त्यांच्यामुळे कॅलिटेक्स जिवंत आहेत. त्यांच्या गावातील महिलाच त्यांच्यासाठी धान्य घेऊन येतात. तसेच कॅलिटेक्स यांना वाटणारी भीती समजून घेत कुठलीही महिला त्यांच्या घरात जाण्याचा प्रयत्न करत नाही.









