चराठा सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप
ओटवणे प्रतिनिधी
चराठा उपसरपंच अमित परब यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर विश्वास ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होऊन परस्पर विरोधी विधाने करीत असल्याची टीका सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.याबाबत सरपंच प्रचिती कुबल, सदस्य गौरी गावडे, वसुधा मेस्त्री, श्रावणी बिर्जे, अना डिसोजा, गोविंद परब, लिवसामेरी फर्नांडिस यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार सावंतवाडी तहसिलदार यांच्याकडे परब यांच्या उपसरपंच पदाविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यांनी चराठे सरपंच यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे परब यांनी आपला राजीनामा अविश्वास ठरावाला घाबरून दिला आहे.त्यामुळे अविश्वास प्रस्तावातील मुद्दे त्यांना प्रत्यक्षरीत्या मान्यच आहेत. दरम्यान ग्रामसभेमध्ये आपल्या मर्जीतल्या व्यक्तीसमवेत खुन्नस प्रवृत्तीने त्यांनी खोडसाळपणा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी जाणून-बुजून काही मूठभर लोकांना एकत्रित आणून ते ग्रामसभेमध्ये गैरसमज पसरून ग्रामस्थांना सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या विरोधात नाहक भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.सरपंचांचे पती ग्रामसभेत मतदार व ग्रामस्थ म्हणून उपस्थित असताना त्यांच्याविरुद्ध पूर्वगृह दूषित आरोप करून त्यांनी आपला बालिशपणा सिद्ध केला आहे. तसेच अमित परब यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या विरोधात ग्रामसभेमध्ये फोटोग्राफी करून व्हायरल करण्यासह महिलांना असभ्य शब्दात वक्तव्य करून अपमानित केल्याप्रकरणी महिला आयोग व संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे या पत्रकात सरपंच व सदस्यांनी म्हटले आहे.









