राजस्थानात एकूण 4 जणांवर एफआयआर
वृत्तसंस्था/ अबोहर
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे नेते दीप कंबोज यांच्यासह 4 नेत्यांच्या विरोधात राजस्थानच्या श्रीगंगानगर पोलीस स्थानकात एका महिलेकडून शारीरिक शोषणाची तक्रार नोंदविण्यात आली आहे. आप नेत्याने शारीरिक शोषण केल्याने गरोदर राहिले, ज्यानंतर नेत्याने कल्पना न देता गर्भपात करविल्याचा आरोप महिलेने केला आहे.
संबंधित महिलेने अबोहर येथे पत्रकार परिषद घेत दीप कंबोज याच्या विरोधात आरोप केले आहेत. दीप कंबोजने श्रीगंगानगर आणि चंदीगढमध्ये शारीरिक शोषण केल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे. आप नेते कंबोज यांनी या महिलेचे आरोप फेटाळले आहेत. संबंधित महिला हनीट्रॅपची सूत्रधार असल्याचा दावा कंबोज यांनी केला आहे. महिलेने ब्लॅकमेलिंग करत माझ्याकडे पैशांची मागणी केली होती असेही त्यांनी म्हटले आहे. कंबोज यांनी संबंधित आरोपांप्रकरणी पक्षनेतृत्वाकडे स्वत:ची भूमिका मांडली आहे.









