वृत्तसंस्था/ प्रयागराज
अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रक्षोभक भाषण प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आझम खान यांना मोठा झटका दिला आहे. उच्च न्यायालयाने सप नेत्याची याचिका फेटाळली आहे. रामपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने आझम खान यांना आवाजाचा नमुना देण्याचा आदेश दिला होता. या आदेशाच्या विरोधात आझम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने आझम यांना आवाजाचा नमुना देण्याचा निर्देश दिला आहे. न्यायाधीश राजीव मिश्र यांच्या खंडपीठासमोर सप नेत्याच्या याचिकेवर सुनावणी झाली आहे.
2007 च्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारसभेत आझम यांनी प्रक्षोभक भाषण केले होते असा आरोप आहे. या प्रकरणी धीरज कुमार सिंह यांनी रामपूर पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी आझम खान विरोधात याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेत सुनावणी केली होती.









