वेंगुर्ले (वार्ताहर)-
राज्यात निर्माण झालेल्या राजकिय पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई घारे परब यांनी सोमवारी खास तातडीने आयोजित केलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विशेष सभेत ‘आम्ही सर्व शरद पवार यांचेच नेतृत्व काल मानत होतो आजही मानत आहोत अन उद्याही मानणार असल्याचा निर्धार जाहिर केला. शरद पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है. च्या घोषणा देण्यात आल्या.
राज्यात निर्माण झालेल्या राजकिय पार्श्वभूमीवर वेंगुर्ले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याची सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई घारे-परब यांनी बोलावलेल्या खास सभेस सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्ष अजित नातू, राष्टवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव सौ. नम्रता कुबल, जिल्हा सदस्य नितीन कुबल, तालुकाध्यक्ष योगेश कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, माजी तालुका अध्यक्ष आबा टांककर, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष फैयाज शेख, महिला तालुकाध्यक्षा सौ. दिपिका राणे, महिला शहर अध्यक्षा सौ. सुप्रिया परब, युवती शहर अध्यक्ष अपूर्वा परब, शहर सचिव स्वप्नील रावळ, बाबतीस डिसोजा, जेष्ठ सदस्य बबन पडवळ, सुभाष तांडेल, आनंद मुळीक यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.









