बेळगाव – सर्व पोलीस अधीक्षकांना उत्तर क्षेत्रामध्ये फोन-इन कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील असे आय जी पी सतीश कुमार म्हणाले. जिल्हा पोलीस मैदानावर प्रॉपर्टी रिटर्न परेडनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सर्व पोलीस अधीक्षकांना महिन्यातील एक दिवस फोन -इन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात बेळगाव जिल्हा पोलिसांनी गुन्हे शोधण्याच्या प्रकरणांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
बीट सिस्टीमचा उल्लेख करून ते म्हणाले की, पूर्वी संशयित सापडल्यावर त्यांना पोलिस ठाण्यात आणून बोटांचे ठसे घेतले जात होते. पण आता हायटेकचे युग आहे. बीट पोलिसांनी मोबाईलवर संशयिताचे बोटाचे ठसे दाबल्यास सर्व काही कळेल, त्यामुळे आरोपी लवकर सापडू शकतात, असे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी व इतर यावेळी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









