उगारखुर्द : धर्मांमध्ये सर्वश्रेष्ठ धर्म म्हणजे जे उपेक्षीत धर्म आहे. त्याला जवळ करून समाजामध्ये त्याच्याविषयी आदर भावना निर्माण करणे, हेच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. त्या पेक्षा मोठा धर्म कोणताही नाही . 12 व्या शतकामध्ये बसवण्णांनी याचीच शिकवण दिली आहे. त्यावेळी धर्माधर्मामधील वाद संपवून सगळ्यांना एकत्रित करण्याचा विशेष प्रयत्न केला होता, असा विचार विजापूर ज्ञानयोगाश्रमाचे प.पू बसवलिंग महास्वामीजी यांनी मांडले.
कागवड तालुक्यातील उगारखुर्द येथे महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळय़ाचे अनावरण करताना ते बोलत होते. स्वामीजी पुढे म्हणाले, बसवण्णांनी आपले जीवन धार्मिक तत्वांवर बांधले होते. केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण विश्वात त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.सर्वांनी बसवण्णांची शिकवण आचरण्यात आणावी, असे सांगितले.
माजी आमदार राजू कागे यांनी, बुद्ध, बसव, आंबेडकर, गांधीजी, छत्रपती शिवराय, वीरराणी कित्तूरू चन्नम्मा, संगोळी रायण्णा यांचे पुतळे उभारल्याने युवा पिढीला प्रेरणा मिळते. ते सोडून अनेक राजकीय मंडळींचे पुतळे उभारले जात आहेत. त्यांची काय म्हणून प्रेरणा घ्यायची, असे सांगून महात्मा बसवेश्वर यांनी भारत देश नव्हे तर संपूर्ण विश्वाला ‘कायकवे कैलास’चा संदेश दिला आहे. त्यांचा पुतळा उगार येथे उभारण्यात आला आहे, असे राजू कागे यांनी सांगितले.
Previous Articleआम्ही आशा व्यक्त करतो, एटीएस चांगला तपास करेल : मेघा पानसरे
Next Article महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी









