गोमंतक मराठी अकादमीच्या आमसभेत उपस्थितांचा सूर : अकादमीच्या अध्यक्षपदी प्रदीप घाडी आमोणकर यांची फेरनिवड,सरकारने मराठी अकादमीचे बंद केलेले अनुदान सुऊ करण्याची मागणी
पेडणे : मराठीच्या उत्कर्षासाठी सर्वांनी एकजुटीने काम करून मराठी भाषेचे संवर्धन करावे, सरकारने मराठी भाषेच्या विकासासाठी गोमंतक मराठी अकादमीचे बंद केलेले अनुदान सुऊ कऊन मराठीवर केलेला अन्याय दूर करावा अशी मागणी करणारा ठराव गोमंतक मराठी अकादमीच्या आमसभेत घेण्यात आला. या आमसभेत गोमंतक मराठी अकादमीच्या घेण्यात आलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी प्रदीप घाडी आमोणकर यांची फेरनिवड झाली तर उपाध्यक्षपदी नरेंद्र आजगावकर यांची निवड झाली.
पर्वरी येथे झालेल्या सभेत कार्यकारणी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सात सदस्यांच्या जांगासाठी निवडणूक घेण्यात आली. नऊ जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत गट क्र: 1 मधून – गोवा विद्यापीठ गोव्यातील महाविद्यालये, उच्च माध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाचे प्रतिनिधी या गटात रवींद्र नंदा बोरकर व स्नेहा अमोल मोरजकर यांची बिनविरोध निवड झाली. गट क्रमांक 3 मध्ये – गोव्यात राहत असलेले मराठी साहित्य गटात उदय कृष्ण मांद्रेकर, प्रभाकर ढगे व भारत बागकर यांची बिनविरोध निवड झाली. गट क्रमांक 4 – मराठीच्या अभिवृद्धीसाठी झटणाऱ्या गोमंतकीय संस्थांचे प्रतिनिधीमध्ये हेमंत कमलाकांत दिवकर यांची निवड झाली. गट क्रमांक 6 – मराठीच्या अभिवृद्धीसाठी झटणारे गोमंतकीय समाज कार्यकर्ते या गटात प्रदीप पुंडलिक घाडी आमोणकर व सुदीप नारायण ताम्हणकर यांची निवड झाली. गट क्रमांक 10 – आमसभेतून भरायच्या जागेसाठी रोहिदास नाईक यांची निवड झाली.
यावेळी कार्यकारणीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी प्रदीप पुंडलिक घाडी आमोणकर तर उपाध्यक्षपदी नरेंद्र गुऊदास आजगावकर यांची निवड झाली. कार्यकरणीच्या सात जागेसाठी प्रभाकर ढगे, भारत बागकर, सुदेश कोचरेकर, महादेव गवंडी, प्रकाश धुमाळ, प्रकाश कळंगुटकर व शामसुंदर कवठणकर यांची निवड झाली. यावेळी आमसभेत मागील सभेचे इतिवृत्त संमत केले. हिशेब तपासनीसाची नेमणूक केली. यावेळी सदस्यांनी विविध सूचना केल्या. निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी सुदेश कोचरेकर यांनी तर सदस्य म्हणून श्यामसुंदर कवठणकर व महादेव गवंडी यांनी सहकार्य केले.
मराठी भाषा सर्वांच्या हृदयात : प्रदीप घाडी आमोणकर
अकादमीच्या विकासासाठी आणि मराठी भाषेच्या वृद्धीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे तसेच प्रत्येक तालुक्मयात मराठी अकादमीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करावे अशा सूचना सदस्यांना केल्या. मराठी ही गोमंतकीयांच्या हृदय सिंहासनावर असलेली जनमानसाची भाषा आहे. तीचे पावित्र्य पोर्तुगीज राजवटीतही नष्ट झाले नाही. येणाऱ्या काळातील मराठी भाषा अशीच हजारो वर्षे अबाधित राहणार असल्याचा विश्वास प्रदीप घाडी अमोणकर यांनी व्यक्त केला. यावेळी प्रभाकर ढगे, अमृत आगरवडेकर, प्रकाश धुमाळ, सुदेश कोचरेकर, रोहिदास नाईक, गुऊदास सावळ, हेमंत दिवकर, स्नेहा मोरजकर यांनी विविध सूचना करत ठराव मांडले.उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर यांनी, मराठी भाषा, मराठी संस्कृतीची जोपासना होण्यासाठी मराठी अकादमीचे सदस्य आपल्यापरीने काम करत आहेत. सरकारने अकादमीला सहकार्य करून मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठीच्या वृद्धीसाठी निधी द्यावा, अशी मागणी करत भविष्यात अकादमी नव्या स्वरूपात कार्यातून पुढे येणार असल्याचा आशावाद व्यक्त करत आमसभेला उपस्थित राहिलेल्या सर्व सभासदांचे त्यांनी आभार मानले.









