ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यसभेच्या निवडणुकांत जी चूक झाली ती चूक पुन्हा होवू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावध पवित्रा घेत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत दगा फटका होऊ नये यासाठी शिवसेनेकडून खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान शिवेसेनेच्या आमदारांची बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदारांना कानमंत्र दिला आहे. तर शिवसेना आपल्या आमदारांना पवईतल्या रेनीसन्स हॉटेलमध्ये ठेवणार आहे.
दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणावरून आपल्या आमदारांना कानमंत्र दिला आहे. दरम्यान शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष उमेदवारांना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन गेल्याचं बोललं जातंय. तर शिवसेनेच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी एकत्र होऊन लढणार असल्याचं सांगितलं आहे.
राज्यसभेच्या निवडणुकांत जी चूक झाली ती चूक पुन्हा होवू नये यासाठी हा कानमंत्र मुख्यमंत्र्यांनी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारांना दिला आहे. राज्यसभेची पुनरावृत्ती पुन्हा होवू नये यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि याविषयीच्या सर्वसाधारण सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीतल्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.








