वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रविवारी येथे झालेल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत हरियाणाने सर्वंकष जेतेपद पटकाविले. हरियाणाच्या अॅथलिट्सनी येथे चाललेल्या स्पर्धेत आपले वर्चस्व राखले होते. हरियाणाने या स्पर्धेत 39 रौप्य आणि 26 कांस्यपदकांची कमाई केली.
या स्पर्धेत उत्तरप्रदेशने दुसरे स्थान मिळविताना 62 पदके पटकाविली. यामध्ये 25 सुवर्ण, 23 रौप्य आणि 14 कांस्यपदकांचा समावेश आहे. तामिळनाडूने या स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले आहे. तामिळनाडूने 20 सुवर्ण, 8 रौप्य आणि 14 कांस्यपदके मिळविली. उत्तरप्रदेशने 25 सुवर्ण, 23 रौप्य आणि 14 कांस्यपदकांची लयलूट करत दुसरे स्थान घेतले. 10 डिसेंबर रोजी या स्पर्धेला प्रारंभ झाला होता.
या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अपंग तिरंदापटू शितलदेवी, थाळीफेकधारक योगेश कथुनिया, टेबलटेनिसपटू भाविना पटेल हे प्रमुख आकर्षण ठरले होते. रविवारी या स्पर्धेतील झालेल्या सेलिब्रल पॅलेसि फुटबॉलमध्ये केरळने तामिळनाडूचा 7-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. टेबलटेनिस प्रकारात केरळने तामिळनाडूवर 7-0 असा विजय नेंदविला. टेबलटेनिस सांघिक प्रकारात केरळने तामिळनाडूचा 7-0 अशा गुणाने एकतर्फी पराभव केला.









