कोल्हापूर :
हद्दवाढीच्या प्रश्नासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो असून सर्वाना विश्वासात, बरोबर घेऊनच हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यासाठी आज मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन दोन दिवसात भेट घेणार असल्याचे खासदार शाहू छत्रपती यांनी सांगितले. ते न्यु पॅलेस येथे आयोजित लोकप्रतिनिधींच्या बैठकी नंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कोल्हापूर शहरांच्या हद्दवाढीचे भिजत घोंगडे बर्याच वर्षापासून आहे.हद्दवाढ समर्थक हे हद्दवाढीसाठी व हद्दवाढ विरोध हे हद्दवाढ होऊ नये म्हणून गेले कीत्येक वर्ष आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. शासन वेळोवेळी हद्दवाढ करणार असल्याचे सांगत आले आहे. मात्र त्यात ठोस कोणताही निर्णय होत नाही. अनेक वेळेस हद्दवाढ विरोधात अनेक गावांनी आपली गावे बंद ठेवून विरोध दर्शवला आहे. हद्दवाढ समर्थक हे वारंवार विविध मार्गाने आपले आंदोलन करत आहेत.गेल्या महिन्यात हद्दवाढ कृती समितीने खासदार शाहू छत्रपती याची भेट घेऊन हद्दवाढी संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यावेळेस खासदार शाहू छत्रपती यांनी मी दोन्ही बाजुने म्हणणे ऐकुन घेऊन निर्णय घेतो असे सांगितले होते.
त्यानंतर सोमवारी संध्याकाळी खासदार शाहू छत्रपती याच्या कार्यालयात लोकप्रतिनिधी व शासन प्रतिनीधी ची बैठक पार पडली याबैठकी साठी खासदार शाहू छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर व जेष्ठ संपादक प्रतापसिंह जाधव हे उपस्थित होते. बैठकी नंतर बोलतांना खासदार शाहू छत्रपती यांनी सांगितले की, शहराच्या दृष्टिकोनातून हद्दवाढ ही महत्वाची असून काहीजरी झाल तरी सर्वांना विश्वासात घेऊनच ही हद्दवाढ करायची आहे. आम्ही सर्वानी मुख्यमंत्र्याची वेळ घेऊन भेट घेण्याचा निर्णय घेतला असून याभेटीसाठी जे लोकप्रतीनी या बैठकीत उपस्थित नव्हते त्याना देखील बरोबर घेतले जाईल.आम्ही शासनाला विनंती करणार आहे की आपण आम्हा सर्वांना बोलवून घेऊन चर्चा करा व निर्णय घ्या. आता शासनाला निर्णय हा घ्यावाच लागेल. असे ही खासदार शाहू छत्रपती म्हणाले.
- हद्दवाढी बाबत आमच्या सर्वाचे एकमत –मुश्रीफ
हद्दवाढीसाठी न्यु पॅलेस येथे आयोजित बैठकीत असणारे खासदार शाहू छत्रपती,पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर या आम्हा सर्व लोकप्रतिनिधींचे कोल्हापूर शहराची हद्दवाढ करायची याबाबत एकमत झाले आहे. असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
- शासनाने निर्णय घ्यायचा आहे
हद्दवाढीसाठी गेले अनेक वर्ष अंदोलन चालु आहेत. विरोधासाठीही अंदोलन होत आहेत. मात्र कोल्हापूर शहराची हद्दवाढ ही आता गरजेची आहे.त्यासाठी याचा गांभीर्याने विचार करुन शेवटी निर्णय शासनाने घ्यायचा आहे.असे खासदार शाहू छत्रपती यांनी सांगितले.
- यात विरोधक समर्थक कोण नाही – प्रकाश आबिटकर
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांनी विचारले की मुख्यमंत्र्यांना भेटताना समर्थक विरोधक असे भेटणार का यावर पालकमंत्र्यांनी सांगितले की,असे म्हणायची काही गरज नाही आम्ही सर्वाना सोबत घेऊन जाणार आहे.
- येत्या आठ दिवसांत निर्णय शक्य – आमदार राजेश क्षीरसागर
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या आठ दिवसांत जाहीर होण्याच्या शक्यता असल्याचे विचारले असता.आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले की,आमच्या सर्वाचा त्याआतच हद्दवाढ व्हावी असा प्रयत्न सुरु असुन त्यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यामुळेच येत्या आठ दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
- नरके मतदारसंघात.. तर अमल महाडीक विमानात..
हद्दवाढीसाठी झालेल्या बैठकीला खासदार शाहू छत्रपती,पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर व जेष्ठ संपादक प्रतापसिंह जाधव हे प्रत्यक्ष हजर होते.मात्र या हद्दवाढीला विरोध करणारे करवीरचे आमदार चंद्रदीप नरके हे मतदार संघात असुनही बैठकीला आले नाहीत. तर दक्षिणचे आमदार अमल महाडीक हे विमानात असल्याने त्यांच्याशी ऑनलाइन उपस्थिती साठी संपर्क होऊ शकला नाही. तर या बैठकीसाठी आमदार अशोक माने,माजी आमदार ऋतुराज पाटील, राहुल पाटील हे उपस्थित होते.तर आमदार सतेज पाटील हे बैठक उशिरा सुरु झाल्याने नियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहु शकले नाहीत.








